Dehuroad News : ऐतिहासिक बुद्धविहाराचा विकास आराखडा तयार करा : आमदार सुनील शेळके

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात आज समिती व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व समाजकल्याण विभाग यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविवाराच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती दिली पाहिजे. या ऐतिहासिक भूमीचे महत्व जपत भावी पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी भव्य ग्रंथालय, अभ्यासिका उभे राहणे गरजेचे आहे. येथील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असेल. त्यासाठी अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून सर्वांसोबत समन्वय ठेवून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात आज समिती व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व समाजकल्याण विभाग यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले. याबाबत माहिती देताना आमदार शेळके बोलत होते.

यावेळी बोधीतत्व जनजागृती संघ, बुद्ध विहार ट्रस्ट, बुद्ध विहार कृती समिती सर्व पदाधिकारी, विशेष अधिकारी समाजकल्याण विशाल लोंढे , समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद फडणीस, निरीक्षक गोपीचंद आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रविण झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागावाचे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते.

25 डिसेंबर 1954 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे पहिली बुद्धमूर्ती बसवली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर याच भूमीवर विहारालगत अस्थीस्तूप तयार करण्यात आल्याने या भूमीला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे.

दरवर्षी या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत असतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.