Dehuroad News : उत्तर प्रदेशात जंगलराज; योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा- हाजीमलंग मारीमुत्तू

एमपीसीन्यूज : हाथरस येथील दलित समाजातील मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार, कुटुंबियांच्या संमतीशिवाय तिच्यावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अटक आणि त्यांना पोलिसांकडून करण्यात आलेली धक्काबुक्की, या घटना पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे स्पष्ट होते. तसेच तेथे जंगलराज सुरु असल्याचे दिसून येते. त्यामुळे या सर्व घटनांची जबाबदारी स्वीकारुन ‘यूपी’चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांनी केली.

शेतकरी आणि कामगार विरोधी विधेयके मंजूर करून मोदी सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यात आला.

देहूरोड शहर महाविकास आघाडी यांच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, नगरसेवक हाजिमलंग   मारीमुत्तू, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, सुनंदा आवळे, प्रवीण झेंडे, मिक्की कोचर, अँथोनी स्वामी, मन्सूरबी काझी, व्यंकटेश कोळी, दीपक सायसर, बाळासाहेब जाधव, गफूर शेख, जावेद शिकीलकर, रमेश जाधव, विशाल दांगट, धनराज शिंदे, ज्योती वैरागर, शीतल हगवणे, रानी पांडीयन, सायबू तेलगू, येशू भंडारी, बिशप डॉ. एम. बी. मनोज, दगडू आठवले, सुखदेव नीकाळजे, धनंजय मोरे, रेणू रेड्डी, शिवाजी दाभोळे, गणेश कोळी, शंकर स्वामी, सुनील विश्वकर्मा, समीर सतेलु,  दामोदर साबळे, गीता रामणारायण, रंजना सपकाळ आदी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारची शेतकरी व कामगार विरोधी विधेयके, उत्तर प्रदेशमध्ये समाजातील मुलीवरील सामूहिक बलात्कार तसेच पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणारे काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्कीचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. कृष्णा दाभोळे, प्रवीण झेंडे, शीतल हगवणे, ज्योती वैरागर, सुनंदा आवळे, रमेश जाधव, दीपक सारसार, गफूर शेख आदींनी मनोगत व्यक्त करीत हाथरस घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गावकामगार तलाठी अतुल गीते यांना निवेदन देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.