Dehuroad News : नागरी भागातील जवानांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करु -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज : देहूरोड शहरातील नागरी भागात लष्कराच्या क्यूआरटी जवानांचा हस्तक्षेप वाढत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासन आणि लष्करी विभागासोबत चर्चा सुरु आहे. लवकरच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. त्याचबरोबर कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरिकांच्या अन्य समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेना निश्चित प्रयत्न करेल. शिवसेना कायम सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

देहूरोडच्या नागरी भागात लष्कराच्या क्यूआर टी जवानांचा वाढता हस्तक्षेप कमी करावा, तसेच स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी शहर शिवसेनेच्या वतीने देहूरोड येथे स्वामी विवेकानंद चौकात एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना खासदार बारणे यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नागरी समस्या सोडवण्यासाठी देहूरोड कॅन्टोमेंन्ट बोर्डाचे मुख्याधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या समवेत खासदार बारणे यांनी बैठक घेतली. यावेळी मुख्याधिकारी हरितवाल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी हरितवाल यांनी खासदार बारणे यांना दिले.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, खासदार बारणे यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. तसेच सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शहरप्रमुख भरत नायडू आणि त्यांच्या सहकार्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, जिल्हा परिषद सदस्या शैलेजा खंडागळे, कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष सारीका नाईकनवरे, कॅन्टोमेंन्ट बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू , माजी नगरसेविका सुनंदा आवळे, देहू शहरप्रमुख सुनिल हगवणे, मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, रोहिदास दांगट, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, संजय पिंजण, राजेंद्र तरस, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, अरुण गोंटे, संदीप बालघरे, संदीप गोंटे, विजू थोरी, बाळासाहेब जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like