Dehuroad News : काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या तंगम्मा मारीमुत्तू यांचे निधन

एमपीसीन्यूज : देहूरोड येथील काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या तंगम्मा काशिनाथ मारीमुत्तू यांचे आज, शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने राहत्या घरी  निधन झाले. त्या 68  वर्षांच्या होत्या.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्यामागे पती, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तंगम्मा मारीमुत्तू या काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्या रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त झाल्या होत्या. आज दुपारी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने गांधीनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

देहूरोड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.