Dehuroad News : शैक्षणिक शुल्क सवलतीसाठी देहूरोडमधील शाळा प्रतिनिधींची बैठक बोलावा : भाजपाची मागणी

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर आणि परिसरातील विविध खासगी शाळामंध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत मिळण्यासाठी शाळांच्या प्रतिनिधींसह सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार यांच्यासह अमोल नाईकनवरे, तुकाराम जाधव यांनी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

याबाबत अधिक माहिती देताना रघुवीर शेलार म्हणाले, मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून मावळमधील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची तहसीलदर मधुसूदन बर्गे यांनी नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीत शैक्षणिक संस्थांच्या सहमतीने शैक्षणिक शुल्कात 35 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आहे.

देहूरोड शहरातही हातावर पोट असणारे गोरगरीब नागरिक मोठयासंख्येने वास्तव्यास आहेत. वर्षभरापासून असलेले कोरोनाचे संकट आणि दोन वेळा लागू केलेले लॉकडाऊन यामुळे या गोरगरिबांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे या गेल्या वर्षीचे आणि या वर्षीचे शेक्षणिक शुल्क भरणे त्यांना शक्य नाही. त्यांना दिलासा मिळावा यासाठी शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणे गरजेचे आहे.

त्यासाठी देहूरोड शहर आणि परिसरातील विविध खासगी शाळामंध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत मिळण्यासाठी शाळांच्या प्रतिनिधींसह सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्याची मागणी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.