Dehuroad Crime News : आमदार समर्थकाचा फ्लेक्स फाडल्याप्रकरणी ‘एनसी’ दाखल

एमपीसीन्यूज : घरगुती पीठ गिरणी आणि वॉटर फिल्टर पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या समर्थक कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेला फ्लेक्स फाडल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी धनंजय विनायक सावंत ( वय-36, रा. चिंचोली, देहूरोड ) यांनी तक्रार दिली आहे. सावंत यांनी चिंचोली गावातील नागरिकांसाठी सवलतीच्या दरात पीठ गिरणी आणि वॉटर फिल्टर उपलब्ध केले आहेत. बुधवारी ( दि. 3) या उपक्रमाचे उदघाटन झाले. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी सावंत यांनी गावात फ्लेक्स लावले. चिंचोली -अशोकनगर येथे लावलेला फ्लेक्स बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने फाडला.

दरम्यान, सावंत यांनी गुरुवारी रात्री देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अडखळ पात्र गुन्हा दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.