Dehuroad News : माय-लेकीला मारहाण करून विनयभंग

एमपीसी न्यूज – मायलेकीला मारहाण करून विनयभंग (Dehuroad News) केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.1) देहूरोड येथे घडला.

विजय सुरेंद्र सुतार (वय 18), शिवशंकर सुरेंद्र सुतार (वय 20, दोघे रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

Chinchwad Bye Election : आम्ही भावनिक राजकारण करत नाही म्हणत ‘आप’ने ठोकला शड्डू

आरोपींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी यांची आई आरोपी विजय याच्या घरी गेल्या. यावेळी विजय याने त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी (Dehuroad News) महिला विजयला अडविण्यासाठी गेल्या असता त्याने फिर्यादी महिलेलाही मारहाण केली.

त्यांच्याशी गैरवर्तन करून जोरात ढकलले. पुन्हा शिवीगाळ केली. तर, आरोपी शिवशंकर याने महिलेच्या भावाला मारहाण केली. पोलीस हवालदार बनसोडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.