Dehuroad News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकासनगरमध्ये शंभर महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला सक्षमीकरणसाठी किवळे-विकासनगर परिसरातील सुमारे शंबर महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विकासनगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  उपमहापौर राजू मिसळ, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. तसेच परवेज शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, महिला शहराध्यक्ष शीतल हगवणे, सामाजिक कार्यकर्त्या सारिका शेळके, शुभांगी वानखेडे, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा अर्चना राऊत आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर आदी उपस्थित होते.

नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा अर्चना राऊत आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात किवळे-विकासनगर भागातील शंभर गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यामुळे संबधीत महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यास सक्षम बनतील. येत्या काही दिवसांत आणखी काही गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.