Dehuroad News : राष्ट्रवादीकडून एम. बी. कॅम्पमधील झोपडीधारकांना मोफत धान्य वाटप  

एमपीसीन्यूज  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पार्थदादा पवार फांऊडेशन, माजी नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्या वतीने विकासनगर परिसरातील एम.बी.कॅम्पमधील झोपडीधारक आणि  दत्तनगर या भागातील गोरगरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात  आले. संकट काळात मिळालेल्या या मदतीमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. 

या वेळी सुमारे   1200 गरजू नागरिकांना अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आले. तसेच  परिसरातील इतर भागातही  टप्प्याटप्प्याने  मोफत धान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी दिली.

राष्ट्रवादी महिला  काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा  अर्चना राऊत,  प्रभाग युवती अध्यक्षा पुजा मुर्गेश,  मुर्गेश आण्णा, अजीज शेख, सोनु शेख, रूपेश तावरे, अभिषेक लोंढे, सलीम शेख, महेंद्र दळवी तसेच एम.बी.कॅम्प  कार्यकर्ते व   पदाधिकारी यावेळी  उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आले.  त्यामुळे हातावर   पोट  असलेल्या गोरगरीब नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  अशा संकटात या नागरिकांना मोफत धान्य  वाटप  करून आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  यापुढेही मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. मनोज खानोलकर : माजी  नगरसेवक . 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.