Dehuroad News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत शेलारवाडी परिसरात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व ‘आपले गाव आपली जबाबदारी’ या कार्यक्रमा अंतर्गत शेलारवाडी (देहूरोड) या गावातील नागरिकांची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. या   सर्वेक्षणात शेलारवाडी गावात कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाही. मात्र, शेलारमळा येथे 9 जण कोरोना बाधित आढळून आले. दरम्यान, या मोहिमेत तपासणी करण्यासाठी आलेले मामुर्डी येथील दोघे आणि विकासनगर येथील एकजण, असे एकूण 12 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिली.

या वेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या ‘आरएमओ’ डॉ. सुनीता जोशी, डॉ. श्रीधर जाधव, भाजपा देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,  जिल्हा उपाध्यक्ष लहूमामा शेलार, विश्व हिंदू परिषद -बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री अमित भेगडे, उद्योजक माऊली भेगडे, विजय माळी, शाम मोहिते, महेश शेलार, संभाजी जाधव, मनोज शेलार, नंदकुमार शेलार, सतीश भेगडे,मयूर शेलार, शिवराज शेलार व गावातील अनेक तरुण तसेच तपासणीसाठी शिक्षक अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

या मोहिमेत ग्रामस्थांची घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येते. त्यामध्ये 60 वर्षांवरील नागरिक, सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण व अन्य आजार असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जाते.

त्यानंतर यामधून संशयित रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते. अर्ध्या तासात याचा अहवाल मिळतो. त्यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना महात्मा गांधी शाळेतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते, अशी माहिती डॉ. सुनीता जोशी यांनी दिली.

या मोहिमेत शेलारवाडी आणि शेलारमळा या भागात एकूण 150  रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात शेलारवाडी गावात कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले नाही. शेलारमळा येथे 9  जण पॉझिटिव्ह आढळले, तपासणीसाठी आलेले मामुर्डी येथील दोन आणि विकासनगर येथील एक असे एकूण 12 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व ‘आपले गाव आपली जबाबदारी’ ही मोहीम आज शेलारवाडी गावात राबविण्यात आली. या मोहिमेत गावातली सर्वांचाच उदंड प्रतिसाद मिळाला. जेष्ठ, तरुण, महिला आणि पुरुषांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. तसेच संशयीत नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्टही करण्यात येत आहे. त्यामुळे ही मोहीम शेलारवाडी गावात यशस्वी झाली.  या मोहिमेत सहभाग घेतलेल्या ग्रामस्थ, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार. रघुवीर शेलार – उपाध्यक्ष , देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.