Dehuroad News : शिवसेनेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद; 55 पिशव्या रक्तसंकलन

एमपीसीन्यूज : छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देहूरोड शहर शिवसेनेच्यावतीने आयोजित शिबिरात एकूण 55 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या दात्याला शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टचे आप्पा घोरपडे यांच्यावतीने एक लाखाचा अपघात विमा काढण्यात आला.

देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयासमोरील ईरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज, मंगळवारी हे शिबीर पार पडले.  शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,  डॉ. यतीन भोळे. डॉ. विवेक नेमाडे,
शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, माजी शहरप्रमुख महेश धुमाळ, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव राजश्री राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, माजी नगरसेवक संजय राऊत, अली शेख, किशोर गाथाडे, काँग्रेसच्या वैशाली अवघडे, शिवसेना विभागप्रमुख शशिकांत सप्पागुरु, शहर संघटक संदीप गोंटे, शहर सल्लागार विलास हिनुकले, देवा कांबळे, सनी कदम, गणेश घोलप, पोपट राक्षे, जयन नायर, नंदकुमार गुराळ, कैलास करमारे, सनी दुधगागरे, प्रणव रोकडे, व्यंकटेश पिंगारी, किशोर आमले, देवराज स्वामी, शिवकुमार कुप्पस्वामी आदींनी शिबिराला भेट दिली, अशी माहिती  शिवसेना उपशहरप्रमुख संदीप बालघरे यांनी दिली.

सूत्रसंचलन संदीप जाधव यांनी केले. संदीप बालघरे, महेश धुमाळ आणि शशिकांत सप्पागुरु यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.