Dehuroad News : देहू कॅन्टोमेंट हद्दीत सोमवारपासून पालिकेच्या आदेशनुसार नियम लागू

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाचा सरासरी पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी विचारात घेता सोमवारपासून (दि.21) निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवार आणि रविवार वगळता सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. देहू कॅन्टोमेंट हद्दीत देखील सोमवारपासून पालिकेच्या आदेशनुसारच नियम लागू राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील निर्बंध शिथील करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार देहू कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रामस्वरूप हरितवाल यांनी देखील आज (रविवारी) निर्बंध शिथील करण्याबाबत सुधारित आदेश काढला आहे. त्यानुसार देहू कॅन्टोमेंट हद्दीत देखील शनिवार आणि रविवार वगळता सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

खालील आस्थापना / उपक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील –

– अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त (Non-Essential Shops) इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

– सार्वजनिक वाचनालय सुरु राहतील.

– स्पर्धा परीक्षा क्लासेस / कोचिंग क्लासेस (Coaching Classes)/ अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था (Training Institute) हॉलच्या आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील.

– मॉल 50% क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र सिनेमागृह (Single Screen and Multiplex) नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.

– व्यायामशाळा (Gym), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (by appointment) फक्त सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूल (A.C.) सुविधा वापरता येणार नाही.

– कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व सुरु राहतील.

– मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.

– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील. फक्त घरपोच सेवा (Home delivery) रात्री 11 पर्यंत सुरु राहील, स्वतः जावून पार्सल आणणे (Take away) बंद राहील. शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा (Home delivery) रात्री 11 पर्यंत सुरु राहील, स्वतः जावून पार्सल आणणे (Take away) बंद राहील.

– लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा (Airport Services), बंदरे सेवा (Port Services) यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

– देहू कॅन्टोमेंट क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते 9 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील.

– देहू कॅन्टोमेंट क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड 19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये (Government Offices and Emergency Services required for Covid 19 Management) 100 % क्षमतेने सुरु राहतील.

– शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयां व्यतिरिक्त) 50 % अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

– सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा (Exemption Category) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी (working days) 50% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.

– सर्व आउटडोअर स्पोर्ट्स (Outdoor games) हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. तसेच इनडोअर स्पोर्ट्स (Indoor games) सकाळी 5 ते 9 व सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरु राहतील.

– सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी राहील.

– लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

– अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

– विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा (General Body) या 50% उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.

– ई – कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील

– देहू कॅन्टोमेंट क्षेत्रात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध राहील. तसेच रात्री 10 नंतर अत्यावश्यक कारण (Valid reason) वगळता संचारबंदी लागू राहील.

– देहू कॅन्टोमेंट क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML) आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने (Without standing) सुरु राहील.

– अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग (Essential goods manufacturing units)

– (अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणा-या उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळी यासह).

– सतत प्रक्रिया करणारे उद्योग (All continuous process industries) – (Units that require process that are of such a nature that these cannot be stopped immediately and cannot restart without considerable time requirement)

– राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित उत्पादन करणारे उद्योग. (Manufacturing of items that are significant to National Security and Defence) Data Centers/Cloud Service providers/ IT Services supporting critical infrastructure and services.

– देहू कॅन्टोमेंट क्षेत्रातील दुकाने, बाजार, कंपनी, फॅक्टरी, बांधकाम स्थळ (Construction Site), हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट इ. ठिकाणी काम करणा-या कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी (RAT) दर पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.