Dehuroad News : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी सारिका नाईकनवरे

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सारिका नाईकनवरे यांची कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नाईकनवरे यांनी काँग्रेसच्या हाजीमलंग मारीमुत्तू यांचा 4 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला.

कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी बोर्ड कार्यालयात शुक्रवारी दुपारी चार वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षसाथनी बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडिअर संजय खन्ना होते.

_MPC_DIR_MPU_II

बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, उपाध्यक्ष रघुवीर शेलार, सदस्य सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळ तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, ॲड. अरुणा पिंजण आदी उपस्थित होते.

या   सभेत प्रारंभी अन्य विषयांवर चर्चा झाली. शेवटी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. भाजपकडून सारिका नाईकनवरे, तर काँग्रेसकडून हाजीमलंग मारीमुत्तू यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केले. गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यात नाईकनवरे यांना 4, तर प्रतिस्पर्धी मारीमुत्तू यांना 3 मते मिळाली. त्यामुळे बोर्ड अध्यक्ष खन्ना यांनी नाईकनवरे यांना विजयी घोषित केले.

नाईकनवरे यांची चालू पंचवार्षिकमध्ये दुसऱ्यांदा कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like