Dehuroad News : इंधन दरवाढीविरोधात देहूरोड येथे शिवसेनेचा एल्गार

एमपीसीन्यूज : एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने स्वामी विवेकानंद चौकात आंदोलन करुन मोदी सरकाराच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, तालुका समन्वयक रमेश जाधव, शहरप्रमुख नायडू, महिला आघाडीच्या संघटिका सुनंदा आवळे, संदिप गोंटे, विजू थोरी, युवा सेनेचे विशाल दांगट, अरुण गोंटे, संदीप बालघरे, मेहरबान सिंग, रामदास अलगिरे , रोहित टेकवडे, देवा कांबळे, संतोष बालघरे, शशिकांत सप्पागुरू, मीना डेरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

मोदी सरकाच्या राजवटीत पेट्रोल आणि डिझेलची सर्वात मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाल्याचे सांगत राजू खांडभोर, रमेश जाधव, सुनंदा आवळे, अरुण गोंटे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.