Dehuroad News : शहरातील वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन – जॉर्ज दास

सध्या दिवस उकाडा व सायंकाळी पाऊस अशी परिस्थिती आहे. त्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

एमपीसीन्यूज : गेल्या काही दिवसांपासून देहूरोड भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कहर म्हणजे आठ आठ तास वीज गायब असते. वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा महावितरणविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास यांनी दिला आहे.

यासंदर्भात दास यांनी महावितरांच्या देहूरोड कार्यालयात निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे मावळ तालुका संघटक किरण गवळी उपस्थित होते.

देहूरोड भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ही समस्या आता नित्याची झाली आहे. त्यात कहर म्हणजे आठ आठ तास वीज गायब असते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात.

सध्या दिवस उकाडा व सायंकाळी पाऊस अशी परिस्थिती आहे. त्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

त्यामुळे देहूरोड शहर आणि परिसरातील विजेची समस्या तातडीने सोडवून वीज पुरवठा सुरळीत करावा; अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष जॉर्ज दास यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.