Dehuroad News : रेडझोन हद्दीतील अवैध बांधकामे व पत्रा शेडवर कारवाई करा – मनसे

एमपीसीन्यूज : देहूरोड परिसरातील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत व रेडझोन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली जात आहेत. अनेक ठिकाणी पत्राशेडही उभारले जात आहेत. या सर्व अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात  रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाचे (शहरी भाग ) मावळ तालुका अध्यक्ष किरण गवळी यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. मनसेचे देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास यांच्या नेतृत्वाखाली मनविसेचे शहराध्यक्ष मलिक शेख यावेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

देहूरोड शहर परिसरातील व महापालिका हद्दीत येणाऱ्या आदर्श नगर, बापदेव नगर, श्री नगर, विकास नगर या भागात रेड झोन आहे. असते असताना तसेच पालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे व पत्रा शेड उभारले जात आहेत. याच परिसरात अनेक मोठ मोठे अवैध टॉवर्स देखील उभे राहत आहेत. या बांधकाम साईटवर कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था दिली जात नाही.

या भागातील अवैध बांधकामे रोखावीत आणि अशा बांधकामांवर त्वरित कारवाई करावी. येत्या सात दिवसात कारवाई कारवाई; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा किरण गवळी,  जॉर्ज दास, आणि मलिक शेख यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.