-MPC-TOP-MOST-BANNER-I

Dehuroad News : अनधिकृत खोदकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा : श्रीजीत रमेशन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत परमार कॉम्प्लेक्स येथे पुणे-मुंबई महामार्गालगत एका हॉटेलच्या नूतनीकरणासाठी सुरु असलेल्या अनधिकृत खोदकाम प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

याबाबत रमेशन यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पुणे-मुंबई महामार्गालगत एका हॉटेलच्या नूतनीकरणासाठी अनधिकृत खोदकाम सुरु आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसून कोरोनाबाबतच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात येत असल्याचे रमेशन यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच हे खोदकाम करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रमेशन यांनी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.