Dehuroad News : शहरात संविधान दिनाचा उत्साह; संविधान प्रास्ताविकेचे वाचन, लाडू वाटप

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर आणि परिसरात आज, गुरुवारी भारताचा देशाचा 71 वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यालय अधीक्षक राजन सावंत, बोर्ड सदस्य गोपाळ तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू, विक्रम जाधव तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले. सावंत यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले.

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या प्रांगणातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला तर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या हस्ते प्रास्ताविकेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

बोर्डाचे कार्यालय अधीक्षक राजन सावंत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी, भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, काँग्रेस शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, शिवसेना शहर प्रमुख भरत नायडू, मनसेचे तालुका उपाध्यक्ष मोजेस दास, भरत बोडके, रिपाइंचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड, नगरसेवक विशाल खंडेलवाल आदींसह कैलास पानसरे, तुकाराम जाधव, गुरमीत सिंग रत्तु, इंद्रपालसिंग रत्तु, संजय धुतडमल, रफिक शेख, डॉमनिक दास, मलिक शेख, गणेश कोळी, अशोक कांबळे, के. एच. सुर्यवंशी, सुरेश भालेराव, बापूसाहेब गायकवाड, आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

देहूरोड शहर आरपीआयच्या वतीने बाजारपेठेतील सुभाष चौकात झालेल्या कार्यक्रमात लाडू वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला, तर जिल्हा उपाध्यक्ष इन्‍द्रपाल सिंग रत्तू त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

आरपीआय युवक आघाडी शहराध्यक्ष जस्सी रत्तू, सचिव राहुल गायकवाड , राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, आरपीआयचे सांगवडे अध्यक्ष बाळू जगताप, नागेश कसबे, अशोक चव्हाण, आलेला भालशंकर आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.