Dehuroad News : सवाना चौकातून निगडीकडे जाणारा सर्व्हिस रस्ता सर्व वाहनांसाठी बंद

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

एमपीसीन्यूज : जुना पुणे -मुंबई महामार्ग ते नविन रेल्वे ब्रिज यांना जोडणारे अंदाजे 50 मीटर एप्रोच रॅपचे तसेच रिटेनिंग बॉलचे काम करण्याचे नियोजित असल्यामुळे देहूरोड वाहतूक विभाग हद्दीतील सवाना हॉटेल चौक येथून निगडीकडे जाणारा सर्व्हिस रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी मोटार वाहन कायदयानुसार पिंपरी चिंचवड शहर यापूर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

देहूरोड सवाना चौकातून निगडीकडे जाणारा सर्व्हिस रस्ता सर्व वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग- सवाना चौक- आधार हॉस्पिटल- स्वामी चौक- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल- सेन्ट ज्यूड स्कुलसमोरुन वळून गुरुद्वारा समोरुन जुना पुणे-मुंबई महामार्ग उड्डाणपुलावरून निगडी बाजुकडे वळविण्यात येणार आहे.

याबाबतचा आदेश दि. 28 जूनपासून 11 ऑगष्ट 2021 या कालावधीकरीता राहील. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. या वाहतूक बदलाबाबत वॉर्डन व वाहतूक कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.