Dehuroad News: देहूरोड, तळेगाव एमआयडीसी आणि वाकड परिसरातून तीन दुचाकी वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – देहूरोड, तळेगाव एमआयडीसी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 16) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहन चोरीच्या पहिल्या गुन्ह्यात अश्विन राजू कोळी (वय 33, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोळी यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रावेतच्या जाधव वस्ती येथील डी मार्टच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते पुन्हा आपल्या गाडीजवळ आले असता त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.

वाहन चोरीच्या दुस-या गुन्ह्यात गौरव मगन म्हसुगडे (वय 21, रा. सडवली, ता. मावळ जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गौरव यांनी त्यांची 36 हजार रुपये किमतीची दुचाकी 28 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आंबी येथील सर्जा हॉटेलच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती. दुपारी एक वाजताच्या सुमारास ते पुन्हा पार्किंग जवळ आले असता त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.

वाहन चोरीच्या तिसऱ्या गुन्ह्यात जावेद इमाम तांबोळी (वय 29, रा. पवार नगर, थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जावेद यांचे वडील इमाम तांबोळी (वय 52) यांच्या नावावर असलेली 15 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास खिवंसरा हॉस्पिटलच्या गेट समोर, सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती. अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.