Dehuroad News : ऑर्डनन्स फॅक्टरी व्यावसायिकरणाविरोधात कामगार संघटना आक्रमक; उद्यापासून आंदोलनाला प्रारंभ 

एमपीसीन्यूज  :  केंद्र सरकारने आयुध उत्पादन मंडळाच्या (ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड) व्यावसायिकरणाचा निर्णय  घेतला असून  या निर्णयाविरोधात कामगार संघटनांनी  जोरदार विरोध दर्शविण्याची तयारी सुरु केली आहे.  त्यासाठी आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीतील  मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी स्थापन  केलेल्या संयुक्त कृती समितीच्यावतीने उद्या  शनिवारी सकाळी  फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर काळ्यापट्ट्या बांधून सरकारविरोधात निदर्शने करण्यात  येणार असून, दुपारी खासगीकरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन  करण्यात येणार आहे. 

संरक्षण मंत्रालयाने आयुध कारखाने (ऑर्डनन्स फॅक्टरी) मंडळाला बरखास्त करून त्याचे कंपनीत रूपांतर करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे सध्या मंडळ या नात्याने कार्यरत असलेले देशभरातील 41 आयुध कारखाने सात कंपन्यांमध्ये विभागले जाणार आहेत. या निर्णयाला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध असून  विविध संघटनांनी या निर्णयाच्या निषेधार्थ  आंदोलनाची तयारी केली आहे.

या आंदोलनासाठी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन (एआयडीईएफ), इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन व संघ परिवारातील भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या तीन कामगार संघटना  एकत्र आल्या आहेत.

या निर्णयास विरोध करण्यासाठी  आगामी  काळात बेमुदत संपदेखील पुकारण्याची तयारी कामगार संयुक्त कृती समितीने केली आहे.   याबाबतचा निर्णय रविवारी होणार असल्याचे समितीचे प्रसिद्धीप्रमुख  अधिक थोरात,  अध्यक्ष गजानन काळे, सचिव  दिलीप झा,  सहसचिव  मोहन घुले आणि  खजिनदार सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.