Dehuroad News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गालगत वृक्षारोपण

एमपीसीन्यूज : जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त माजी नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्या प्रयत्नांतून किवळे गावठाण आणि देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामागार्लालगत वृक्षारोपण करण्यात आले.

त्यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा अर्चना राऊत, विकासनगर युवती अध्यक्षा पुजा मुर्गेश तसेच नेसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सद्स्य दीपक भवर, श्री. चिगाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत एकूण 50  वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ अशा देशी वृक्षांचा समावेश होता. तसेच या मोहिमेत तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.

वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. हे ओळखून या पूर्वीही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने किवळे आणि परिसरात राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आलो आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्व कळून चुकले आहे. त्यामुळे या पुढे परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत माजी नगरसेवक खानोलकर यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.