Dehuroad News : विविध राजकीय पक्षांकडून नेताजी बोस, शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

एमपीसीन्यूज : देहूरोड येथील मेन बाजारात नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shivsenapramukh Balaseheb Thackeray) जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

देहूरोड येथील ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात आयोजित कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय, पिपल्स रिपब्लिकन पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.

शिवसेना कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर आणि युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, शिवसेना महिला आघाडी संघटक सुनंदा आवळे, लक्ष्मीअक्का मिनगी, शिवसेना उपशहरप्रमुख संदीप बालघरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हजीमलांग मारीमुत्तू, काँग्रेस महिला अध्यक्ष सौ ज्योती वैरागर, राणी पांडियन, वेंकटेश कोळी, अल्पसंख्याक सेलचे गफुर शेख, सायबू तेलुगु, राष्ट्रीय उत्सव समितीचे अमोल व्यवहारे, आशिष बंसल, राष्ट्रवादीचे रेणू रेड्डी, धनराज शिंदे, गोविंद राऊत, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपालसिंग रत्तू, राहुल गायकवाड, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अरुण जगताप, शिवसेनेचे अरुण गोंटे, विलास हीनकुले, देवा कांबळे, सुरेश मुळे, गणेश सावांत, शशिकांत सप्पागुरू, जयन नायर, संतोष बालघरे, रामदास अलगिरे, लालचंद शर्मा, गणेश घोलप, राजू पंडित, नितीन जाधव, शहानुर काझी, कैलास करमारे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे व शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आढावा घेतला.

शिवसेना व युवासेना नामफलकाचे उदघाटन

त्यानंतर चिंचोली शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे व शिवसेना व युवासेना नामफलकाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, युवा सेना तालुका अधिकारी अनिकेत घुले यांच्या हस्ते करण्यात आले. महिला आघाडी तालुका संघटक शैला खंडागळे, देहू शहरप्रमुख सुनील हागवणे उपस्थित होते.

शेवटी माय बाल भवन अंध अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.