Dehuroad news : काँग्रेसच्यावतीने अहमद पटेल यांना आदरांजली

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसीन्यूज : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष व खासदार अहमद पटेल यांचे आज, बुधवारी निधन झाले. यानिमित्त देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

गांधीनगर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू व वार्ड क्रमांक चारचे नगरसेवक गोपाळ तंतरपाळे यांच्या हस्ते दिवंगत पटेल यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उपस्थित काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, कार्याध्यक्ष दीपक सायसर, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर शेख, महिला काँग्रेसच्या राणी पांडीयन, गोपाळ व्यंकोबा राव, युवा नेते सायबू तेलगू, येशू भंडारी, शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख बबन पाटोळे, राहुल टेमकर, महिला कार्यकर्त्या गीता राजलिंगम रामणारायण, संगीता वर्धा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हाजीमलंग मारीमुत्तू यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिवंगत अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच काँग्रेस पक्षासाठी त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाविषयी माहिती देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.