Dehuroad News : देहूरोडमध्ये विविध राजकीय पक्षांच्यावतीने ‘महामानवा’ला अभिवादन

एमपीसीन्यूज : काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट), आझाद समाज पार्टी तसेच अन्य राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने भारतीय घटनेचे शिल्पकार  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

देहूरोड शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते कॅंटोन्मेंट रुग्णालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष गफूर शेख, व्यंकटेश कोळी, दीपक सायसर, सायबू तेलगू, येशू भंडारी, प्रमोद रोकडे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( आठवले गट) वतीने ऐतिहासिक सुभाष चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष राहुल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनीही महामानवाला अभिवादन केले.

_MPC_DIR_MPU_II

यानंतर सरबत आणि लाडू वाटप करण्यात आले. ‘रिपाइं’चे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपालसिंग रत्तू, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष नगिना काझी, युवक शहराध्यक्ष जसविंदरसिंग रत्तू, सिद्धार्थ चव्हाण, दिलीप कडलग, राहुल गायकवाड, सुरेश गायकवाड, मिलिंद भालशंकर, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

आझाद समाज पार्टी देहूरोड शहर व मावळ तालुका यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले, महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक अशोक कोकाटे व ज्येष्ठ समाजसेवक विश्वनाथ धोबी, आझाद समाज पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष प्रकाश म्हासे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या नंतर लाडू वाटप करण्यात आले.

यावेळी देहूरोड शहराध्यक्ष सचिन माने, मावळ तालुका उपाध्यक्ष रीना टाक, शहर कार्याध्यक्ष मनप्रीत सिंग रत्तू, उपाध्यक्ष राजा पिल्ले, सामाजिक कार्यकर्ते चंदा पवार, अमित इंगळे, अमोल म्हेत्रे, बाबु तुपदोर, सागर मुंडास, किशोर ठोकले, सागर तेलगु, मंजुनाथ खोत आदी उपस्थित होते. कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन पोलिस व नागरीक मित्र चंद्रभान गायकवाड, किशोर जगताप यांच्या बंदोबस्तात कोरोनाचे नियम पाळून संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.