Dehuroad News : काँग्रेसच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ऐतिहासिक सुभाष चौक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते नेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडीयण, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती वैरागर, शहर उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, कार्याध्यक्ष दीपक सायसर, अल्पसंख्यांक सेलचे मावळ तालुका अध्यक्ष गफूर शेख, सरचिटणीस गोपाळ राव, सायबू तेलगू, येशू भंडारी, तारिक रंगरेज, योगेश टाकळकर, आनंद तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याचप्रमाणे देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

या वेळी कॉग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, अरुण गोंटे , देवा कांबळे, जयेन नायर आदी उपस्थित होते.

तसेच टीयूसीसी संघटना आयुध निर्माणी देहूरोड या संघटनेचेच्या वतीनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांच्यासह प्रमोद घुले, राकेश सोनवणे, प्रशांत कोकाटे, मिलिंद भालेराव, सुरेश कुंभार, संदीप भोर, रमेश रामन, गजानन काळे, राम रायकवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.