Dehuroad News : देहूरोड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

एमपीसीन्यूज : लोकनेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त देहूरोड येथील गोपीनाथ मुंडे चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष सुर्यकांत सुर्वे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना आदरांजली अर्पण केली.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, गुरमीतसिंग रित्तु, मदन सोनिगरा, महावीर बरलोट, उमेश जैन, तुकाराम जाधव, अमोल नाईकनवरे, उमाशंकर सिंग, सुनील खानेकर, विनय बरलोट, संदेश भेगडे, प्रवीण फाकटकर आदी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.