Dehuroad News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात असैनिक कामगारांचे लसीकरण सुरू

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हाॅस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार संरक्षण क्षेत्रातील असैनिक कामगारांना याठिकाणी लस दिली जात आहे.

देहूरोड शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरू झाला आहे. त्यामुळे ॲम्युनशन डेपोतील कामगारांसाठी लसीकरण कार्यक्रम घेण्यात यावा, अशी मागणी डेपोतील कामगार संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती.

त्यानुसार देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हाॅस्पिटलमध्ये असैनिक कामगारांचे कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले. सीएमओ डॉ. अनिल कुमार यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सध्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असून, 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.