Dehuroad News : ‘विहिंप’चे जिल्हा सहमंत्री दिनेश श्रीवास यांचे निधन

एमपीसीन्यूज : विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्हा सहमंत्री दिनेश जोगेश्वर श्रीवास (वय ४३) यांचे आज, शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ, पुतणे, असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_II

दिनेश श्रीवास यांनी गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत देहूरोड परिसरातील गोरगरीब नागरिकांना अन्नदान, आयुर्वेदिक काढा वाटप केले होते. त्यांच्या अकाली निधनाने देहूरोड शहर व विश्व हिंदू परिषद, बजरंग दलावर शोककळा पसरली आहे.

सोमवारी (दि. 12) देहूरोड येथील शितळादेवी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.