Dehuroad News : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मतदार याद्या प्रसिद्ध

दावे आणि हरकतींसाठी 20 जुलैची मुदत

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड निवडणूक नियमावली 2007 अन्वये सन 2021 करिता सातही वॉर्डांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या  याद्या उद्या, 1 जुलै ते 20 जुलै 2021 या कालावधीत कॅंटोन्मेंट कार्यालयमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सर्व नागरिकांना पाहण्याकरिता उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मतदार यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या नावाबद्दल  आक्षेप असल्यास  लेखी स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेन्ट बोर्ड देहूरोड यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन कॅंटोन्मेंट बोर्ड अध्यक्ष तथा ब्रिगेडिअर संजय खन्ना यांनी केले आहे.

ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ नाहीत अथवा त्यांचे नाव अन्य वॉर्डांमध्ये समाविष्ट झाले असल्यास किंवा नावात चूक झाली असल्यास संबधीत व्यक्ती मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्याकरिता अथवा दुरुस्ती करिता विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

मतदार यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या नावाबद्दल  आक्षेप असल्यास संबंधित दावे विहित नमुना फॉर्म क्रमांक तीन, आक्षेप असल्यास फॉर्म क्रमांक चार या 1V-a दावेदाराच्या सहीसह अथवा आक्षेप घेणाऱ्याच्या सहीसह लेखी स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅंटोन्मेंट बोर्ड देहरोड यांच्याकडे सादर करू शकतात.

तसेच आक्षेप आणि दावे वितरणाच्या तारखेपासून 20 दिवसात पोहोचतील अशा बेताने पोस्टाद्वारे सादर करावेत. सदरचे दावे विहित नमुन्यात दिलेल्या मुदतीत सादर न केल्यास ते विचारात घेतले जाणार नाहीत.

प्राप्त दावे व हरकती यांची सुनावणी कॅंटोन्मेंट बोर्ड अध्यक्ष अथवा त्यांच्या प्रतिनिधींमार्फत 5 ऑगस्ट 2021 नंतर सुनावणी घेण्यात येतील, असे ब्रिगेडिअर खन्ना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.