Dehuroad News : ‘भीम आर्मी’चा शिवरायांना मानाचा मुजरा

0

एमपीसीन्यूज : ‘भीम आर्मी भारत एकता मिशन’ संघटना देहूरोड शहराच्या वतीने मेन बाजारातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे  छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात  साजरी करण्यात आली. यानिमित्त नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.

नेताजी सुभास चौकात शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव आणि शिवस्मारक समितीचे पै. बाळासाहेब फाले यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भीम आर्मीचे शहराध्यक्ष प्रकाश म्हासे यांच्या हस्ते शिवस्मारक समिती येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी भीम आर्मीच्या जिल्हा संघटक रीना टाक, किशोर ठोकले, अमित इंगळे, सचिन माने, सागर मुंडास, मनप्रीतसिंग रत्तू, सादिक शेख, विशाल बिडलान, सचिन धेंडे, विजय गायकवाड, अजय पंचगुंडे, अमोल म्हेत्रे,  राष्ट्रवादी शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, शिवस्मारक समितीचे बाळासाहेब फाले, ह्युमन राइट्स जस्टिस असोसिएशनचे रज्जाक शेख, चंद्रशेखर पात्रे, ‘रिपाइं’चे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपाल सिंग रत्तू, शहराध्यक्ष सुनील गायकवाड, जसविंदरसिंग रत्तू, राहुल गायकवाड, देवा कांबळे, शशीकांत सप्पागुरु, संदीप बालघरे, लालचंद शर्मा, जयन नायर, कैलास ठाकुर यांच्यसह सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.