Dehuroad News : इंधन दरवाढीविरोधात देहूरोड काँग्रेसचे आंदोलन

एमपीसीन्यूज : मोदी सरकारच्या काळात तसेच सध्याच्या कोरोना महामारीत झालेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ देहूरोड ब्लॉक काँग्रेसच्यावतीने मोदी सरकारचा आज, सोमवारी निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व पुणे जिल्हा काँग्रेस यांच्या आदेशानुसार देहूरोड ब्लॉक काँग्रेसच्यावतीने माजी नगरसेवक आणि शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, महिला शहराध्यक्ष ज्योती वैरागर, जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडियन, गीता राजलिंगम रामनारायण, प्रमोद रोकड़े, व्यंकटेश कोळी, गफूर शेख, संभाजी पिंजण, वासंती वेटरीवेल, सायबू तेलगू, अशोक कूसळे, संगीता वरदा, जावेद सिकीलकर,पोपट मोहीते, माणिक वाघमारे, आसीब सय्यद, अबु वीरन आदी उपस्थित होते.

मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात कोरोना लसीकरणात आलेले अपयश, पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव आणि महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेली आर्थिक दुर्दशा, वाढती बेरोजगारी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की अशा मुद्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फलकाद्वारे निषेध नोंदवला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.