Dehuroad News : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष गोविंदराव जाधव यांचे निधन

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व चिंचोली गावचे रहिवाशी गोविंदराव जाधव यांचे अल्पशा आजाराने काल बुधवारी रात्री निधन झाले.

त्यांच्या मागे तीन विवाहित मुली, एक मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.  ते देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व 15 वर्ष बोर्ड सदस्य होते.

तीर्थक्षेत्र देहूगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील  शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे व लायन कमलेश जाधव यांचे ते वडील व शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे ते सासरे  होते. त्यांच्या निधनाने चिंचोली गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.