Dehuroad News : पंडित नेहरू यांनी भारताच्या विकासाचा पाय रचला : हाजीमलंग मारीमुत्तू

एमपीसीन्यूज : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे प्रथम पंतप्रधान म्हणून भारताच्या विकासासाठी दीर्घकालीन उपयुक्त ठरतील अशा अनेक योजना राबवल्या. पायाभूत सुविधा, शिक्षण आणि विज्ञानावर भर देत नेहरू यांनी देशाच्या विकासात्मक उभारणीचा पाया रचला, अशा शब्दांत काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू यांनी पंडित नेहरू यांना आदरांजली अर्पण केली.

भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देहूरोड शहर काँग्रेसच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष मारीमुत्तू आणि अभिजीत केतकर यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गांधीनगर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष राणी पांडियनयांच्यासह गीता राजलिंगम रामनारायण, वसन्ति वेट्रीवेल, त्वमनी राजू अम्मावसी, प्रमोद रोकड़े, वेंकटेश मारीमुत्तू, शंकर मारीमुत्तू, मुत्तू अम्मावसी, आसीब सय्यद, अबु वीरन, योगेश भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.