Dehuroad News : धाडसी निर्णयांमुळे इंदिरा गांधींविषयी जगभरात आदर – हाजीमलंग मारीमुत्तू

एमपीसीन्यूज : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशाला दिलेले योगदान आणि बलिदान कुणालाही विसरता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच आजही जगभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते, असे प्रतिपादन काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू यांनी केले.

देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मेन बाजारातील ऐतिहासिक सुभाष चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते स्वर्गीय गांधी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. त्यावेळी स्वर्गीय गांधी यांच्या आठवणींना मारीमुत्तू यांनी उजाळा दिला.

यावेळी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राणी पांडीयन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव, वॉर्ड क्रमांक सातचे अध्यक्ष संभाजी पिंजण, युवा कार्यकर्ते सायबू तेलगू, विल्सन पालीवाल, तारिक रंगरेज, योगेश टाकळकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.