Dehuroad : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून भावाला मारहाण करणारा आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तिच्या भावाला मारहाण केली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका नराधमाला अटक केली. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी अकराच्या सुमारास दुर्गामाता मंदिराच्या मागे देहूरोड येथे घडली.

याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गांधीनगर, देहूरोड येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय (नातेवाईक) नराधमाला अटक केली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. रविवारी सकाळी पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपीने घराचा दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील वर्तन केले. हा प्रकार मुलीच्या भावाने पहिला.

भावाने आरोपीकडे याबाबत विचारणा केली असता आरोपीने भावाला देखील मारहाण केली. मारहाण करून आरोपी पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.