सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Dehuroad : एक लाख बौद्ध अनुयायांनी केली ‘महाबुद्धवंदना’

एमपीसी न्यूज – देहूरोड येथे तब्बल एक लाख बौद्ध अनुयायांनी आज, बुधवारी (दि. २५) महाबुद्धवंदना केली. 25 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते देहूरोड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25 डिसेंबर रोजी बौद्ध अनुयायी एकत्र जमतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बौद्ध अनुयायांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला.

यावेळी ऐतिहासिक धम्मभूमीच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार श्रीरंगआप्पा बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्रआप्पा भेगडे, रघुवीर शेलार, बाळासाहेब शेलार, कैलास पानसरे, सारिका नाईकनवरे, विशाल खंडेलवाल, मदन सोनिगरा, सागर लांघे आदी उपस्थित होते.

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर सकाळी संपूर्ण देशभरातून बौद्ध अनुयायी एकत्र आले. दरम्यान, काही महत्वाच्या शहरांमधून देहूरोडसाठी रेल्वे देखील सोडण्यात आल्या. देहूरोड येथील धम्मपीठावर शेकडो बौद्ध भिक्खू आले. बुद्ध काळाच्या प्रभावाने नंतर सुमारे बाराशे वर्षानंतर पुन्हा एकदा भारतभूमीत बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेले देहूरोड येथील हे बुद्ध विहार अद्वितीय ठरलेले आहे. डॉ. बाबासाहेबांना डोळे बंद करून एकाच ठिकाणी बसलेले तथागत बुद्ध अभिप्रेत नव्हते.

त्यासंबंधी ते म्हणतात, ‘तथागत बुद्ध देशाच्या कानाकोपऱ्यात अखंडपणे डोळे उघडे ठेवून आयुष्यभर फिरत राहिले, जगाचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि त्यांचे हे भ्रमण पायी चालत असे. तथागत गौतम बुद्धांनी कधीही वाहन अथवा साधन प्रवासासाठी वापरले नाही. डॉ. बाबासाहेबांना डोळे उघडे असलेले तथागत बुद्ध अपेक्षित होते. रंगून येथे अशीच डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांना मिळाली. त्याच मूर्तीची देहूरोडच्या विहारात स्थापना करण्यात आलेली आहे. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ही ऐतिहासिक घटना फार महत्त्वाची असून या घटनेची नोंद इतिहासात होईल आणि या लहान बुद्ध मंदिरापासून धम्मक्रांतीला सुरुवात होईल’ असे उद्गार काढले होते.

spot_img
Latest news
Related news