Dehuroad : बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

निखिल उर्फ लखन बाळू आगळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देहूरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रमोद उगले यांना माहिती मिळाली की, विकासनगर येथे एकजण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून निखिल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जीवनात काडतूस मिळाले. यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण, उपनिरीक्षक अशोक जगताप, सहाय्यक फौजदार सुभाष सावंत, कर्मचारी प्रमोद उगले, अनिल जगताप, संकेत घारे, सचिन शेजाळ, किशोर परदेशी, विकी खोमणे, नारायण तेलंग यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.