Dehuroad : अंगावर क्रेन पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अंगावर क्रेन पडल्याने कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सातच्या सुमारास शेलारवाडी तळवडे येथे घडली.

रामअवतार निषाद (वय 22, रा.पाटील नगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत रामअवतार कुशवाह इंडस्ट्रीज या कंपनीत काम करत होता. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेलारवाडी तळवडे येथील साईटवर काम करत असताना क्रेन रामअवतारच्या अंगावर पडले. यामध्ये रामअवतारच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नेहरूनगर येथील आणखी दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेही उपचार न झाल्याने त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.