Dehuroad : दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीवर मागे बसलेला तरुण दुचाकीवरून खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना लंडन ब्रिज, रावेत येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

राहुल माणिक हुंबे (वय 24) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी युवराज हरिभाऊ हुंबे (वय 35, रा. ईट, ता. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमेश हौसेराव बोराडे (रा. येवलेवाडी, देहू) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी रमेश आणि जखमी राहुल हे दोघे दुचाकीवरून (एम एच 14 / सी क्यू 4526) जात होते. रमेश दुचाकी चालवत होता. भोंडवे पेट्रोल पंपाकडून लंडन ब्रिजवरून जात असताना रमेश याने निष्काळजीपणाने दुचाकी चालवली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेला राहुल खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.