Dehuroad : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या ऑनलाईन नोकरी महोत्सव आणि रक्तदान शिबीर

Online job fair and blood donation camp on the occasion of NCP's anniversary to be held tomorrow.

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21  व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या, बुधवारी देहूरोड येथे ऑनलाईन नोकरी महोत्सव आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहर आणि राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी ( दि. 10 ) सकाळी 10  ते सायंकाळी 5 या वेळेत हे देहूरोड बाजारपेठेतील शुभश्री हॉस्पिटल येथे हे शिबीर होणार आहे.

या वेळी मावळचे आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे , पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ऑनलाईन नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी https://forms. gle/xikubng6MBGTpPgp8  या लिंकचा वापर करावा.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन ऍड. दाभोळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.