Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रुग्णवाढीचा वेग मंदावला; आज 3 रुग्णांची नोंद

patient growth slowed in cantonment board area ; 3 patients registered today

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  रुग्णवाढीला ब्रेक मिळाला. हद्दीतील मामुर्डी या भागात आज, गुरुवारी 3 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तीन रुग्णांना देहूगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज  एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 558 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 3 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 558 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 31 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

110 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 21 रुग्ण उपचार घेत आहे. आज, एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 15 इतकी आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.