Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आता ‘ही ‘ दुकाने सुरु करण्यास परवानगी

एमपीसीन्यूज : प्रतिबंधित क्षेत्रातून (कॅटेन्मेन्ट झोन) वगळण्यात आल्यानंतर देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्स, लॉंड्री, ऑप्टिकल, झेरॉक्स आणि फोटो स्टुडिओ ही दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

शिवाजीनगर येथे दोन कोरोनबाधित रुग्ण आढळल्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. हा आदेश 17 मेपर्यंत लागू होता. दरम्यान, हद्दीत कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे 18  मेपासून येथील प्रतिबंधित क्षेत्र वगळण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने घेतला.

त्यामुळे सोमवार ते शनिवार या दरम्यान दररोज सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत भाजीपाला, किराणा, मटण-चिकन व अन्य दुकाने खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती.

त्यानंतर आता   स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्स, लॉंड्री, ऑप्टिकल, झेरॉक्स आणि फोटो स्टुडिओ ही दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्स सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, तर लॉंड्री, ऑप्टिकल, झेरॉक्स आणि फोटो स्टुडिओ ही दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच पुढील शासकीय आदेश येईपर्यंत  ही दुकाने सुरु राहतील, असेही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच राज्य शासनाच्या आदेशान्वये अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने, रुग्णालये , दवाखाने, बँका, गॅस एजन्सी, रेशनींग दुकाने, पेट्रोल पंप सुरु राहतील, असेही या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.