Dehuroad : संत तुकाराम महाराजांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्याबाबत एकावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश निर्मळ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय दामोदर मोरे (वय 53, रा. देहूगाव, ता. हवेली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने बुधवारी (दि. 11) सकाळी आठच्या सुमारास सोशल मीडियावर संत तुकाराम महाराज यांचे आक्षेपार्ह चित्र आणि संदेश प्रसारित केला. त्या संदेशाला आक्षेपार्ह कमेंट देखील दिली. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.