Dehuroad : अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी अॅट्रॉसिटीसह पॉक्सोचा गुन्हा

एमपीसी न्यूज – चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून दुकानदारावर अॅट्रॉसिटीसह पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास किवळे येथे घडली.

रतनलाल चौधरी (रा. आदर्शनगर, किवळे) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बुधवारी सायंकाळी शाळेतून घरी येत असताना चॉकलेट घेण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली. दुकानदार आरोपी रतनलाल याने मुलीला आणखी चॉकलेट घेण्यासाठी आग्रह केला.
तसेच काऊंटरबाहेर येऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी रतनलाल याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (अॅट्रॉसिटी) आणि बाल लैंगिक अत्याचाराचा (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.