Dehuroad : कॅंटोन्मेंट बोर्डाच्यावतीने वॉर्ड क्रमांक तीन येथे वृक्षारोपण

Plantation at Ward No. 3 on behalf of Cantonment Board

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्यावतीने वॉर्ड क्रमांक तीन मधील श्री शिवाजी विद्यालयामागील इंदिरानगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक व कॅंटोन्मेंटचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल व काँग्रेसचे शहराध्यक्ष व स्थानिक नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी अशोक कुसाळे, माणिक वाघमारे, पोपट मोहिते आदीसंह स्थानिक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

इंदिरा नगर येथे सुमारे शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश असल्याचे नगरसेवक मारीमुत्तू यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.