Dehuroad : पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

Police arrest accused in murder case : तीन वर्षांपूर्वी केला होता एकाचा खून

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटत होता. विक्रम उर्फ गब्बर बिडलान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तपास पथकातील पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ आणि सुमित मोरे यांना माहीती मिळाली की, देहूरोड पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ठाण्यातील रामनगर येथे आहे.

त्यानुसार पोलिसांनी ठाणे शहरात जाऊन रामनगर परिसरात सापळा रचून आरोपी विक्रम याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील तीन वर्षांपूर्वी देहूरोड परिसरात एक खुनाचा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी विक्रम याला अटक केली आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उप-निरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, सचिन शेजाळ, सुमित मोरे, विजय गेंगजे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.