Dehuroad : जेष्ठ नागरीकावर हल्ला करुन जबरी चोरी करणा-या दोघांना देहूरोड पोलिसांकडून अटक

Dehuroad police arrested two persons for attacking a senior citizen and committing robbery.

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकाला अडवून त्यांच्यावर हल्ला करत ज्येष्ठ नागरिकाचा मोबईल फोन आणि सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार देहूरोड परिसरात घडला होता. त्या गुन्ह्यातील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

विनायक भारत कोळी (वय 26, रा. देहूरोड) आणि गण्या उर्फ गणेश महावीर भुंबक (वय 23, रा. किन्हईगाव, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2020 मध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला अडवून त्यांच्याकडील मोबईल फोन आणि सोन्याची साखळी असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना देहूरोड परिसरात घडली होती. त्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्याचा तपास करत आरोपी विनायक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केलेला मोबईल फोन लोहियानगर झोपडपट्टी, गंजपेठ पुणे येथे एकाला विकला असल्याचे सांगितले.

पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी गण्या याला देखील अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मोबईल फोन आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, सचिन शेजाळ, विजय गेंगजे, सुमित मोरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.