Dehuroad : तारेच्या कुंपणावरून ऑर्डनन्स फॅक्टरीत घुसणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तारेचे कुंपण पार करुन बेकायदेशीररीत्या ऑर्डनन्स फॅक्टरीत घुसणार्‍या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या परिसरात दबा धरून बसल्यानंतर फॅक्टरीतील जवानांनी त्याला शोधून पोलिसांसमोर उभे केले. ही घटना देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे शनिवारी (दि. 4) सकाळी घडली.

निटीभर पजाट (वय 31 रा. पुडा, पोदेव डोंगरा, ताकटनी, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गौरव ज्ञानेश्वर माळवी (वय 34, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड येथे गार्ड कमांडर सनाई करमेश चन्‍द यांना गार्ड पोस्ट क्रमांक सात येथे एक इसम तार कुंपण पार करून फॅक्टरीच्या आत प्रवेश करताना आढळून आला. त्यांनी तात्काळ याबाबत त्यांच्या वरिष्ठांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर ऑर्डनन्स फॅक्टरी मधील गार्डन यांनी संपूर्ण फॅक्टरी परिसरात शोध घेतला. त्यावेळी एक व्यक्ती आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला देहूरोड पोलिसांसमोर हजर करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.