Dehuroad : कॅन्टोन्मेंट रुग्णालयात परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज : जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या सर्व परिचारिका व कर्मचाऱ्यांचा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते पुष्प देऊन गौरव करण्यात आला.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक रघुवीर शेलार ग्रुपच्या वतीने कोरोना योद्धयांचे स्वागत करण्यात आले.

सध्याच्या कोरोना संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा बजावण्यासह देहूरोड शहर कोरोनामुक्त करण्यात परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे, अशा शब्दांत शेलार यांनी परिचारिकांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डचे मुख्यकार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी, डॉ. किरण मूळे, श्रीधर जाधव, कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, दिनेश वारके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे, भाजप उत्तर भारतीय आघाडीचे शहराध्यक्ष दिनेश सिंग, शंकरराव शेलार नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आशिष बन्सल तसेच दिनेश शेलार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.